डॉ. प्रविण सौदागर पतंगे
प्रिय COVAS Parbhani,
काय म्हणू तुला,एक सरकारी महाविद्यालय की एक कार्यालय, का एखादी शैक्षणिक संस्था....नाही मी तुला एक "वास्तू" म्हणेल ; जी वास्तू सगळ्या शुभंकर गोष्टींना "तथास्तु" म्हणत गेली.आज १८ मे २०२२ या महाविद्यालय रुपी वास्तूला ५० वर्ष पूर्ण झाली. तुला या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खुप साऱ्या शुभेच्छा.अशीच सोन्यासारखी तेजाळत रहा आणि माझ्यासारख्या अनेकांच्या वाटा प्रकाशमान कर.....
कॅलेंडर मधली १८ मे तारीख सारखं खुणावत होती मला,ज्या वास्तूनी इतकं भरभरून दिलंय तिच्याबद्दल काहीतरी लिहण्यासाठी..... म्हणून हे पत्र खास तुझ्यासाठी,COVAS,Parbhani. ह्या पत्राला पत्ता सापडेल का नाही ठाऊक नाही पण माझ्यासारख्या कित्येकांच्या भावना तुझ्यापर्यंत पोचतील.
१२वी नंतर CET मार्क्सवर BDS च्या शेवटच्या यादीत नाव आल त्याच दिवशी B.V.Sc. चा फॉर्म घेऊन कॉलेजला पोहोचला,तेंव्हा TVCSC च्या गेट समोर एक माणूस उभा होता. New Admission ???....Come Here असं म्हणत तो मला वाट दाखवत होता. त्याची इंग्लिश ऐकून थोडा अवाक झालो.....'Z ' होता तो.( त्याला Z का म्हणायचे ते कालांतरानं कळलं) इथून सगळा प्रवास सुरू झाला. फर्स्ट year चा Seniors नी सांगितलेला तो Grass Haircut आणि ९० अंशातला नमस्कार आजही आठवतो. Fresher's Introduction चे तर प्रत्येकाचे वेगवेगळे मजेशीर किस्से आहेत.
Anatomy चे Dorsal,Ventral, Dorso-Ventral लक्षात ठेवताना डोक्याचा भुगा व्हायचा.पण मामडे सर खूप तळमळीने शिकवायचे आणि Anatomy आपली झाली. Biochemistry ला येवतीकर सर पहिल्या lecturer चा Class संपण्याआधी येऊन उभे असायचे,१ तासाच्या lecture मध्ये काय शिकवायच ते Shortly बोर्डच्या उजव्या कोपऱ्यात लिहून ते शिकवून पूर्ण करायचेच.LPM चा पेपर म्हणल की बाकी चारही कॉलेजची पोरं निवांत असायची,आम्ही मात्र कित्तेक रात्री जागून काढायचो, कारण एकच एम.एफ.सिद्धिकी सर....कडक शिस्तीचा माणूस.Farm Management काय असत ते घोटून घोटून शिकवल त्यांनी,तेच आज पावलो पावली उपयोगाला येतंय. Microbiology मधे HS,BQ,Anthrax सारखे रोग खूप मजेशीर रित्या अब्दुल अजीज सर शिकवायचे.Class संपण्याआधी एक दिलखुलास शेर त्यांच्या खास उर्दू Accent मध्ये ऐकायला मिळायचा.
Parasitology तर कोळून पाजली नरळदकर सरांनी, Prescribed Syllabus पूर्ण करण्यासाठी आमच्या आधी क्लासला पोचायचे सर.Ruminal Surgery & Radiology चा कोर्स आहेर सरांनी घेतला होता.एखाद्या पटाईत चित्रकार सहजतेने चित्र काढाव तसे Nerve Block शिकवताना Figures बोर्ड वरती काढायचे सर. नंतर कितीतरी दिवस त्या Figures कोणी बोर्डवरून मोडत नसायच.TVCSC ला Large आणि Small Animals चा खूप access असायचा त्यामूळे field ला काम करताना कोणतीच अडचण येत नाही सध्या.pass out झाल्यावर दोन वर्षाच्या गॅप नंतर सरकारी नोकरीत रुजू झालो, नोकरीच्या पहिल्याच दिवशी I/V लावताना first prick मध्ये needle व्यवस्थित बसली आणि मनातल्या मनात TVCSC ला हात जोडले. Gynaecology च्या Practical वेळी मार्कंडेय सर म्हणायचे ५०० वेळा PD केली तरच PD करता येईल तुम्हाला.भीतीपोटी त्या लाल कंधारी गाईंच्या जबर लाथा खाल्ल्या आम्ही. पण त्या लाथांचा प्रसाद पशुपालकांकडून शाबासकीच्या रुपात आम्हाला भेटत आहे.
कॉलेज मधल्या फक्त Teaching स्टाफच नाही तर Non Teaching स्टाफ कडून खूप काही शिकायला मिळालं. Parasitology Dept. ला पारडे मामा होते, आम्ही क्लिनिक वरून Fecal sample न्यायचो microscope खाली Eggs दिसले की पारडे मामा म्हणायचे, Toxocara, Haemonchus... आम्ही अवाक असायचो. जरी ते Technically शिकले नव्हते तरी शिकण्याचा डोळस दृष्टिकोन त्यांच्याकडून घेण्यासारखा होता. असं म्हणतात की,"Necropsy is the best way to Learn the Diseases" हेच सहज केलं पिराजी मामांनी. Farmच्या शेवटच्या टोकाला PM असायचं, गंगणे सर Pathophysiology सांगत PM सुरू ठेवायचे आणि म्हणायचे पिराजी Liver दाखवा,Kidney दाखवा,Spleen दाखवा आणि पिराजी मामा सगळे organs अचूक समोर ठेवायचे.Clinic ला वसंत मामा Autoclave केलेले सर्व Surgical Instruments एका विशिष्ट Chronology नी arrange करायचे,खूप शिकण्यासारखं होत ते कारण,'If you want to be a Surgeon firstly you have to be a good Assistant'. हे सगळे Technically Sound नसले तरीही त्यांची शिकण्याची आणि आत्मसात करण्याची इच्छा खूप प्रबळ होती. नाहीतर आज नौकरीत आम्ही बघतो, " काय तुझा उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी ..." अशी असते.
आमच्या Annual Exam भर उन्हाळ्यात असायच्या , मेसवाला बंटी दुपारी २ वाजता डबे आणायचा सगळी मुलं भुकेनी हैराण.PM झाल्यावर Carcass वर कशी श्र्वापदं तुटून तसे आम्ही तो उशीरा आला की डब्यांवर तूटून पडायचो.ह्या दिवसात एकच आधार असायचा, कॅन्टीन चे समोसे आणि रामाच्या टपरीवरचे पोहे...
आता ज्युनिअर मुलं सगळया activities चे photos पाठवतात तेंव्हा आम्हा प्रत्येकाला आमच्या Fresher's Party, Gathering, Farewell function आठवतात. आज माझही तसच काहीस झालंय, थोडा Nostalgic झालोय. या वास्तूत शिकून गेलेल्या प्रत्येकाचं सोन झालंय,त्यात मोलाचा वाटा या वास्तूचा,तिथं काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे.
आज १८ मे COVAS,Parbhani ५० वर्ष पूर्ण करत आहे,या वास्तुने समाजाला खुप चांगली व्यक्तिमत्त्व दिली आहेत याचं श्रेय इथ ज्ञानदान करणाऱ्या सर्व गुरुजनांच... त्या सर्वांना आमचा प्रणाम.... आजच्या दिवशी खुप साऱ्या गोष्टी दाटून येताय पण तूर्तास इथ पूर्ण विराम. ह्या महाविद्यालयाचा आणखी खूप चांगला कायापालट होवो, अनेकांची झोळी ज्ञानानी शिगोशिग भरो हीच आजच्या दिनी सदिच्छा...
- या वास्तूत शिकलेला एक विद्यार्थी
डॉ. प्रविण सौदागर पतंगे
पशुधन विकास अधिकारी
९८९०७४९४२९